शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

प्राधिकरण पाजतंय थकबाकीचं पाणी ! ग्राहकांची धावपळ; नियमित बिल भरणाºयाला बहात्तर हजारांचा ‘झटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:23 IST

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या माध्यमातून अ‘नियमित’ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायमच येत असतात. आता तर

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या माध्यमातून अ‘नियमित’ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायमच येत असतात. आता तर नियमित बिल भरणाºया ग्राहकांना मोठ्या रकमांच्या थकबाकीची बिले पाठवून त्यांना बेजार करण्याचा उद्योग सुरू झाला आहे. शाहूपुरीतील वीज ग्राहकाने मागील महिन्याचे बिल भरूनही त्यांना ७१ हजार ७६० रुपयांच्या थकबाकीचे बिल पाठविण्यात आले आहे. हे बिल पाहून कटके यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले.परशुराम कटके व रामचंद्र अण्णा शिंदे यांनी २० वर्षांपूर्वी शाहूपुरीतील चैतन्य कॉलनीमध्ये एकत्रित प्लॉट खरेदी केला होता. प्राधिकरणामार्फत शिंदे यांनी नळकनेक्शन घेतले. परशुराम कटकेही या पाण्याचा वापर करतात. याच कनेक्शनची बिले अनेकदा वाढवून पाठविले जात आहेत.

नळांना मीटर लावल्यापासून प्राधिकरणाचा भोंगळ कारभार समोर येऊ लागला आहे.संबंधित ग्राहकाची चालू देय रक्कम ५६७ रुपये आहे. मागील थकबाकी ६८ हजार ४४४ इतकी दाखवून थकबाकीवरील अधिभारासह तब्बल ७१ हजार ७६० रुपयांचे बिल त्यांना पाठविण्यात आले. १५ जानेवारी २०१८ पर्यंत हे बिल भरावे लागणार असल्याने परशुराम कटके यांनी प्राधिकरण कार्यालयाकडे धाव घेतली. प्रमाणापेक्षा जास्त आलेले बील तत्काळ बदलून देण्याची मागणी करण्यात आली.प्राधिकरण कार्यालयात हेलपाटेशाहूपुरीतून प्राधिकरण कार्यालयात येण्यासाठी स्पेशल रिक्षा केल्यास त्याचे भाडे २०० रुपयांच्या आसपास जाते. हे वाचवण्यासाठी पहिल्यांदा शाहूपुरीतून रिक्षाने राजवाड्यावर जायचे व तिथून दुसरी रिक्षा पकडून पोवईनाक्यावर मग तिथून चालत प्राधिकरण कार्यालयात जावे लागते. असा प्रवास करायचा म्हटले तरी साधारणत: ४० रुपये लागताच. बिल कमी करण्यासाठी पदरमोड करून जावे लागते. कार्यालयात जाऊन अधिकाºयांच्या मिन्नतवाºया करायच्या, त्यानंतर बिल कमी केले जाते. मात्र खर्च होणारे रिक्षाचे भाडे आणि होणारा मानसिक त्रास याचे काय करायचे?, असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत.

मी गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा ग्राहक आहे. चार ते पाच बिले व्यवस्थित येतात; परंतु त्यानंतर अधूनमधून वाढीव रकमेची बिले मिळतात. मग ही बिले कमी करण्यासाठी कामधंदा सोडून प्राधिकरणाचे कार्यालय गाठावे लागते, हा मन:स्ताप थांबावा, अशी माझी इच्छा आहे.- परशुराम कटके, ग्राहक, शाहूपुरी